बेळगावसह सीमाभागात नवरात्र दरम्यान होणारी दुर्गामाता दौडीने जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.दौडीत आबालवृद्ध तर सहभागी होतातच पण जांबोटी येथे एक कुत्राही दौडीत दरवर्षी सहभागी होत आहे.
खानापूर तालुक्यातील जांबोटी मध्ये सुरू झालेल्या दुर्गामाता दौडीमध्ये एक कुत्राही सहभागी झाला असून हा कुत्रा चर्चेचा विषय ठरला आहे.दरवर्षी हा कुत्रा दौडीत सहभागी होतोय.दररोज दौडीला वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रारंभ होतो पण दररोज हा कुत्रा दौड सुरू होण्याच्या ठिकाणी हजर असतो.विशेष म्हणजे इतर लोक यायच्या आधी हा कुत्रा तेथे उपस्थित असतो.
जांबोटी येथील दौड बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,हब्बनहट्टी मारुती मारुती,रामपूर पेठ राम मंदिर,स्वामीजी मठ, अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून दौड सुरू होत असतें.पण या मुक्या प्राण्याला दौड कोठून सुरू होते आणि हा कसा अगदी वेळेवर तेथे उपस्थित असतो याचे कुतूहल जनमानसात निर्माण झाले आहे.
शिव प्रेम असणारा हा कुत्रा पाळीव नसून भटका आहे मात्र त्याच्या दौडीत सहभागी व्हायची चर्चा मात्र जांबोटी परिसरात रंगत आहे.