पश्चिम घाटात अतिवृष्टीची शक्यता असल्याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कृष्णा,कोयना आणि पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.अतिवृष्टीमुळे धरणातून पाणी सोडावे लागणार आहे असे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवले आहे.
त्यामुळे आगामी चार,पाच दिवसात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नदीकाठच्या गावातील जनतेने आवश्यक साहित्य आणि जनावरे घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
स्थलांतर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती मदत करणार आहे.त्या दृष्टीने तयारीही केलेली आहे.आपत्कालीन स्थिती उदभवल्यास त्याला तोंड देण्यासाठी सुरक्षा पथके देखील सज्ज आहेत असे जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.