विसर्जन तलावावर कुणालाही त्रास होणार नाही सर्व सुविधा देऊ असे म्हणणाऱ्या बेळगाव महापालिकेचा दावा फोल ठरला आहे.दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन अंधारात करावे लागले आहे बेळगावातील टिळकवाडी भागातील महा पालिकेच्या जक्कीन होंड तलावात हा प्रकार पहायला मिळाला आहे.
मंगळवारी दुपारी नंतर शहरात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले टिळकवाडी येथील मनपाच्या जक्कीन होंड तलावात देखील 800 हुन अधिक घरघुती मूर्तींचे विसर्जन झाले मात्र सायंकाळी नंतर झालेले विसर्जन गणेश भक्तांना अंधारात करावे लागले.अनेक गणेश भक्तांनी एक तर मोबाईल टॉर्च चा वापर केला नाही लांबून कार किंवा दुचाकी गाड्यांच्या हेड लाईटच्या प्रकाशाचा वापर करत गणेश विसर्जन केले.
स्मार्ट बेळगाव म्हणून घेणाऱ्या मनपा असोत किंवा हेस्कॉम यांच्या दुर्लक्षित पणा मुळे गणेश भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.शांतता समिती बैठक असो किंवा गणेश मंडळाचे निवेदनास उत्तर देताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आश्वासन कुठं गेलं?असा प्रश्न विचारला जात आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे मंगळवारी गणेश भक्तांना चक्क अंधारात गणेश विसर्जन करावे लागले महा नगर पालिका किंवा हेस्कॉम कडून इथे विद्युत दीप देखील बसवण्यात आलेले नाहीत. केवळ विद्युत दीपच तर काय टिळकवाडी पोलीस देखील इथून गायब होते गणेश विसर्जन करताना अंधारात अनेक प्रकार घडू शकतात मात्र शासनाने याकडे डोळेझाक केली होती इथून पुढे तरी ही चूक सुधारावी अशी मागणी केली जात आहे.