बेळगाव शहरात 350 हुन अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत या सर्व गणेश मंडळात इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवून सर्वांचे लक्ष वेधून घेणारे मंडळ म्हणून नानावडीचे सार्वजनिक गणेश मंडळ पुढे आले आहेत गेल्या सहा वर्षा पासून वेगवेगळ्या मूर्ती बनवत त्यांनी सगळ्यांचे आकर्षण खेचले आहे.
गेल्या सहा वर्षात या मंडळाने ड्राय फ्रुटस,विविध प्रकारचे धान्य, वाळू,कागदी फुले,उपवासाचे पदार्थ ,तळलेले मोदक,पेपर कप,यांचा वापर करून मूर्ती करण्यात आली होती.
बेळगावातील नानावाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अक्रोडच्या टरफलापासून गणेश मूर्ती साकार केली आहे.
व्हॉइस ओव्हर-१९४८साली नानावाडी श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आहे.मूर्तिकार सुनील आनंदाचे यांनी ही मूर्ती साकारली आहे. तब्बल चार पोती टरफले या गणेश मूर्तीला लागली आहेत.
मूर्तीला लागणारी टरफले दिल्लीहून मागविण्यात आली आहेत.दिल्लीला अक्रोड सोलण्याचा कारखाना असून त्यांनी ही टरफले मोफत दिली आहेत.फक्त दिल्लीहून आणण्याचा वाहतूक खर्च करावा लागला आहे.मूर्ती तयार करताना मुर्तीकाराने काठीचा सांगाडा तयार करून त्याला कागद आदी चिकटवले आहेत.
नंतर त्यावर अक्रोडची टरफले चिकटवण्यात आली आहेत.ही टरफले चिकटवणे कष्टदायक काम होते.पण रात्री दहा नंतर नानावडीतील नागरिक,रिक्षा चालक,दुकानदार यांनी रात्री उशिरापर्यंत जागून टरफले चिकटवली आणि मूर्ती साकारली. मूर्ती तयार करताना कोणतंही रसायन किंवा रंग वापरले नाहीत.एक महिना इतका कालावधी ही मूर्ती तयार करण्यासाठी लागला