मार्कंडेय नदीच्या पुरात उचगाव जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील रस्त्यांची वाताहत झाली आहे घरांची पडझड झाली आहे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले हे रस्ते त्वरित दुरुस्त करा पडलेल्या घरांना आणि शेतकऱ्यांना पिकासाठी नुकसान भरपाई द्या अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली आहे.
बुधवारी जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र यांची भेट घेऊन त्यांनी विविध विषयांवर चर्चा करत समस्या निदर्शनास आणून दिल्या.मार्कंडेय नदी ब्रिज पासून आंबेवाडी गावचा पूर्ण रस्ताच पुरात वाहून गेलाय अश्या रस्त्याची पहाणी करण्याचे सौजन्य देखील सार्वजनिक बांधकाम खात्याने दाखवले नाही असा आरोप करत या शिवाय हिंडलगा ब्रिज ते मन्नूर आणि वेंगुर्ला बेळगाव उचगावं रस्त्याची देखील चाळण झाली आहे त्वरित हे रस्ते दुरुस्ती करा अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत असा इशारा देखील पाटील यांनी दिलाय.
मार्कंडेय नदी काठावरील सर्वच गावातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई लागू करा अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
पावसात अनेक घरांची पडझड झाले बेळगाव तालुक्यातील एक हजार घरे कोसळली आहे ग्रामीण भागातील घरांची संख्या अधिक आहे.अनेक गावातून पी डी ओ पडलेल्या घरांची पहाणी करायला देखील टाळाटाळ करत आहेत अश्या घरांना त्वरित नुकसान भरपाई द्या अशी सरस्वती पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर वकील नामदेव मोरे यांच्या सोबत केली आहे.यावेळी अनेक महिलांनी पडलेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचा आग्रह धरला.
जळीत ग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी
जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आंबेवाडी येथील जळीत ग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी केली आहे.
आंबेवाडी येथील गावडु मारुती यळगुकर आणि विनोद मारुती यळगुकर यांचे घर एक वर्षापूर्वी जळले होते. एक वर्षापासून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे या घटनेची चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.