येळ्ळूर गावचे फुटूक तलाव म्हणजे उन्हाळ्यातील कुस्तीचे महाराष्ट्र मैदान…सीमा भागातला कुस्तीचा सर्वात मोठा आखाडा हा येळ्ळूरचा च्या महाराष्ट्र मैदानात भरतो ज्या मैदानात आखाडा भरतो ते फुटूक तलाव तब्बल 40 वर्षांनी ओव्हरफ्लो झाले आहे.
हा तलाव ओव्हर फ्लो होतांच ग्राम पंचायत सदस्यांनी तलावाला भेट देऊ अतिरिक्त पाणी शेतवाडीत बाहेर काढले त्यामुळे तलाव फुटण्याचा धोका टळला आणि आज बाजूच्या घरातून देखील पाणी घुसले नाही.
रावस मासे पकडण्यासाठी गर्दी
पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने यापूर्वीचे सगळे विक्रम मोडीत काढायचे ठरवले आहेत असे दिसून येत आहे.सलग पाचव्या दिवशी देखील पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असून शहर परिसरातील नदी,नाले दुथडी भरून वाहत आहेत.गेली अनेक वर्षे तुडुंब भरली नव्हती अशी तळी देखील या संततधार पावसामुळे भरून वाहू लागलेत.येळ्ळूरचा फुटुक तलाव बरोबर अरवळी तलाव देखील मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागलाय. हट्टी गावच्या या तलावातून पाण्याचा विसर्ग होत असून या तलावात मासे देखील मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत मासे आकाराने मोठे देखील आहेत.तलावात सापडणारे मासे पकडण्यासाठी सर्व वयोगटातील व्यक्ती तळ्याकडे आलेले पाहायला मिळाले.रावस जातीचे मासे या तलवात मिळत आहेत.