मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एक महिन्यांहुन अधिक काळा नंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले नव्हते अखेर या गोष्टीला देखील मुहूर्त मिळाला असून नवीन मंत्र्यांना खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा यांनी शपथ घेतल्या नंतर केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून आधी मंत्रिमंडळ विस्तार आता खाते वाटपासाठी वाट पहावी लागली होती. मंत्री पदाची शपथ घेतलेल्या 17 मंत्र्यांची खाती असलेली यादी राज भवनाला पाठवण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्याला नेहमीप्रमाणे फार मोठी खाती मिळाली नसली तरी या मंत्रिमंडळात समाधानकारक खाती मिळाली आहेत.लक्ष्मण सवदी परिवाहन खाते तर शशिकला जोल्ले यांना महिला आणि बाल कल्याण खाते मिळाले आहे. माजी मंत्री विरकुमार पाटील यांच्या नंतर जोल्ले यांच्या रुपात निपाणी मंत्री पद मिळाले आहे तर अथणीला सवदीयांच्या नंतर पुन्हा एकदा तेच मंत्री बनले आहेत.
तीन उपमुख्यमंत्री
बी एस येडीयुरापा सरकार मध्ये गोविंद कारजोळ अश्वथ नारायण आणि अथनीचे लक्ष्मण सवदी या तिघांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे.मंत्री आणि खाती खालील प्रमाणे आहेत.
के एस ईश्वराप्पा-ग्रामीण विकास पंचायत राज ,
बसवराज बोंम्मई-गृह गुप्तचर खाते,
गोविंद कारजोल-सार्वजनिक बांधकाम, समाज कल्याण प्रभार
अश्वथ नारायण-उच्च शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान
जगदीश शेटटर- मोठे मध्यमंअवजड उद्योग,
आर अशोक-महसूल मजुराई-
बी श्रीरामलू -आरोग्य,
सी टी रवी- पर्यटन कन्नड संस्कृती,
शशिकला जोल्ले – महिला बाल कल्याण,
लक्ष्मण सवदी- परिवाहन,
जी सी मधूस्वामी-संसदीय कामकाज, कायदा
श्रीनिवास पुजारी- मत्स्य आणि बंदरे विकास,
सी सी पाटील-खाण भूगर्भ खाते
एच नागेश-अबकारी खाते
प्रभू चव्हाण-प्राणी (animal husbandary)
बुधवारी आणखी तीन आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी देखील माहीती उपलब्ध झाली आहे.