1ऑगस्टपासून मराठा लाईट इन्फंट्रीत सैन्य भरतीत महिला पोलीस भरती सुरू आहे. पहिल्या दिवशी 260 महिला उमेदवाराना भरतीत प्रवेश दिला आहे. मुलाखत पत्र बघूनच प्रवेश दिला जात आहे. आजची ओपन भरती समजून महिला उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यामुळे गोंधळ उडाला.
भरतीसाठी गर्दी केलेल्या व आणि गेटवर आंदोलन करणाऱ्या महिला उमेदवारांची समजूत काढून त्याना परत पाठवण्यात आले.
भरतीच्या ठिकाणी केवळ भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवाराला प्रवेश देण्यात आला होता. नातेवाईकांना प्रवेश न दिल्याने कॅम्पमधील रस्त्यावर गर्दी केली होती. धावणे, उंच उडी, लांब उडी , वजन उंची याची चाचणी घेण्यात आली.
आता भरतीस आलेल्या महिलांमध्ये कुणाची निवड होणार हे त्यांच्या त्यांच्या चाचणीच्या प्रतिसादावर ठरणार आहे.