Friday, December 20, 2024

/

कत्ती जारकीहोळी जेडीएस च्या वाटेवर?

 belgaum

येडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर असंतुष्ट आमदारांची संख्या वाढत आहे. बेळगाव जिल्ह्यातील कत्ती आणि जारकीहोळी ब्रदर्स आपण ज्या पक्षातून भाजपमध्ये आले होते त्या मूळ जेडीएस पक्षात जाऊन घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.जेडीएस नेते असलेले बसवराज होरट्टी यांच्याशी उमेश कत्ती यांनी बातचीत केल्याची माहिती मिळत असून ही माहिती जर खरी ठरल्यास उमेश कत्ती आणि भालचंद्र जारकीहोळी भाजप सोडून जाण्याच्या वाटेवर असतील.

मंत्रिमंडळाचा विस्तार करताना केवळ 17 जणांना मंत्रीपदे करून सरकारने रोष ओढवून घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या केंद्रीय भाजपच्या वरिष्ठांनी यादी फायनल केली त्यांनीच हा घोळ येडींच्या माथी लावून दिल्लीहून परत पाठविले असल्याचे दिसते.

उमेश कत्ती यांना मंत्रिपद मिळेल अशी मोठी आशा होती कारण ते पक्षामध्ये सीनियर आहेत. आपल्याला देण्यात येईल ते मंत्री पद घेऊ असे त्यांनी सांगितले होते .मात्र पक्षाने त्यांची घोर निराशा केली आहे .भालचंद्र जारकीहोळी हेसुद्धा आपल्या मंत्री पदाबद्दल उत्सुक होते. मात्र त्यांना त्रास देण्यात आला आहे. सलग दोन वेळा भाजपमधून आमदार झालेल्या शशिकला जोल्ले यांना मंत्रीपद देण्यात आले. त्याचबरोबर सध्या आमदार पदावरही नसलेल्या लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद देण्यात आले यामुळे उमेश कत्ती आणि जारकीहोळी ब्रदर्स मधील असंतोष वाढला आहे.

या असंतोषातून भाजपला धक्के बसणार का? हे पुढील काळात कळणार आहे मात्र जी परिस्थिती जेडीएस काँग्रेस सरकारची झाली तीच परिस्थिती आज भाजप सरकारची झाली असून असे झाल्यास लवकरच निवडणूक अटळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.