केलेल्या दोघां युवकांना केवळ तीन दिवसांच्या आतच गजाआड केल्याची कामगिरी ए पी एम सी पोलिसांनी बजावली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्या जवळील मुद्देमाल जप्त केला आहे.
चोरी केलेले तेवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने जप्त करत दोघांवर ए पी एम सी पोलिसांनी कारवाई केली आहे. हसन कासीमसाब बेग वय 38 रा. मेहबूबनगर धारवाड तर मंजलेश हुसेनसाब मकानदार वय 29 रा.वैभव नगर बेळगाव अशी या अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या 18 आगस्ट रोजी वैभव नगर येथील घर फोडून दागिने लंपास केले होते ए पी एम सी पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा छडा केवळ तीन दिवसांच्या आत लावला आहे.डी सी पी हटगुंडी मार्केट ए सी पी भरमनी आदींनी ए पी एमसी पोलीस निरीक्षक जे एम काळीमिर्ची आदी सहकाऱ्यांचे या कारवाई बद्दलअभिनंदन केले आहे.


