-तिहेरी तलाख विरोधात बेळगाव जिल्ह्यात पहिल्या प्रकरणाची नोंद सौंदत्ती तालुक्यातील यक्कुडी येथे झाली आहे.बीबी आयेशा नामक महिलेने तिहेरी तलाख विरोधात सौंदत्ती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पत्नीला बरं नाही म्हणून पत्राद्वारे तिहेरी तलाख देणाऱ्या गोव्यातील इस्माईल खान विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अलीकडेच तिहेरी तलाख विरोधात कायदा अंमलात आला आहे.
दहा महिन्यांपूर्वी गोव्यातील इस्माईल खानचा विवाह बीबी आयेशा हिच्याशी झाला होता.पत्नीची तब्येत बरी नाही म्हणून इस्माईल याने पत्नीला माहेरी पाठवले होते.माहेरी आल्यावर बीबी आयेशा हिने डॉक्टरांना दाखवले पण डॉक्टरनी तिला काहीही झाले नाही म्हणून सांगितले.
नंतर बीबी आयेशा हिच्या आई वडिलांनी तिला सासरी घेऊन जाण्यास इस्माईल याला कळवले पण त्याने तिला बरे नाही उपचाराची गरज आहे म्हणून सांगितले.नंतर पोस्टाद्वारे सतरा हजार रु.चा डिमांड ड्राफट मेहेर म्हणून पाठवून तिहेरी तलाख घेतला. या प्रकरणी सौंदत्ती पोलिसांनी तपास सुरू केला आहे.