म्हशी चारवायला गेलेल्याचा झाड कोसळून मृत्यू झाला आहे.गुरूवारी सकाळी ही घटना किल्ला दुर्गादेवी मंदिराजवळ उघडकीस आली . चव्हाण वय( 48) रा. खडक गल्ली असे या घटनेत मयत झालेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार राजू हे गेल्या सोमवारी म्हशी चारवायला गेले होते किल्ल्यात झाडाखाली आश्रय घ्यायला बसले होते त्यावेळी झालेल्या पावसाने मोठे झाड कोसळले त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता सोबत चरायला गेलेली जनावरे रात्री उशिरा घरी आली होती त्या दिवशी पासून ते बेपत्ता होते.
त्या नंतर घरातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली होती गुरुवारी सकाळी झाडाच्या बड्याखाली सापडलेला त्यांचा मृतदेह आढळला. कोसळलेले झाड इतके मोठे होते मृतदेह दिसत नव्हता.या प्रकरणी मार्केट पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
मयत राजू चव्हाण हे गवळी होते त्यांनी अनेक म्हशी पाळल्या होत्या म्हशींना चारवयाला ते दररोज घेऊन जात असत म्हशी चरतेवेळी झाडाखाली बसले असता पावसात अचानक झाड पडले त्यातच त्यांचा अंत झाला.बेळगावचे रणजी क्रिकेट पटू मिलिंद चव्हाण यांचे ते बंधू होते.