कर्नाटक सरकारचे उपमुख्यमंत्रीपद मिळवलेल्या आणि परिवहन मंत्री पदाचा भार असलेले लक्ष्मण सवदी यांनी हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना डी के शिवकुमार यांच्यावरील कारवाई राजकीय प्रेरित नसून तो एक कारवाईचा भाग असल्याचे म्हटले आहे.
सरकार दाखल होताच विरोधी पक्षातील नेत्यांना कचाट्यात अडकवले जात असल्याचा आरोप भाजप वर होत आहे या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी अशा आरोपांना नाकारून फक्त कारवाईचा भाग असल्याचे म्हटले आहे.
कर्नाटकात परिवहन मंडळ तोट्यात आहे. त्यामुळे परिवहन मंडळ सुधारण्यासाठी प्रयत्न करणार्या वेगवेगळ्या सुविधा घेऊन येणार आहे. असे त्यांनी सांगितले. लक्ष्मण सवदी यांना निवडणुकीत अपयश आले असले तरी भाजपने मंत्रिपद बहाल करून लगेचच उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. त्यामुळे पक्षात नाराजी आहे.
पण त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे हे त्यांच्या बोलण्यावरून दिसत असून त्यांना मिळालेल्या परिवहन खात्याला लवकरच तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.