काल 15आगस्ट सुट्टीचा दिवस असताना आणि नागरिकांना ध्वजवंदनसाठी धावपळ करायची असताना दिवसभर पावसाने मारा केला . आज पावसाने सकाळपासून उघडीप दिली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान आहे .ठीकठिकाणी वाढलेले पाणी उपसण्यासाठी पाऊस जाणे गरजेचे आहे
पूरस्थिती कमी झालेली नाही अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे .घरामध्ये साचलेले पाणी बाहेर गेल्याशिवाय स्थलांतरित नागरिक परत आपल्या घरी दाखल होऊ शकत नाहीत. अशा वेळी किमान दहा ते पंधरा दिवस पाऊस जाणे गरजेचे आहे.
शेतांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान होत असून वरून पावसाचा मारा थांबल्यास शेतातील पाणी उतरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात पिके वाचू शकतील. पाऊस न थांबल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
सध्या नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू झालेली असली तरीसुद्धा पावसाचा मारा जोरात सुरू राहिल्यास आणखी नुकसान होऊन नागरिकांना त्रास होऊ शकतो. यासाठी आता बळीराजाने तरी पावसाने जावे अशी मागणी होत आहे.