वाढता पाऊस आणि पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शाळांना आणखी तीन दिवस सुट्टी दिली आहे .गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस शाळा बंद राहणार असून रविवारी साप्ताहिक सुट्टी तर सोमवारी बकरी ईद ची सुट्टी असे सलग पाच दिवस शाळकरी विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार आहे.
आठवडाभर सुट्टी दिल्याने झालेल्या अभ्यासक्रमाचे नुकसान भरून काढण्यासाठी शनिवारी रविवारी शाळा घ्या असा देखील आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे .पुढील दिवसात रविवारी आणि शनिवारी शाळा भरवून सुट्टीचा अभ्यास क्रम भरून काढा असेही त्यांनी म्हटले आहे.
सतत सुरू असलेल्या पावसाने कुणी घरातून बाहेर पडण्यास तयार नाही त्यामुळे शाळकरी मुलं तरी कशी शाळेला जाणार त्यामुळे दोन दिवस दिलेली सुट्टी वाढवा अशी मागणी झाली होती त्यामुळे शासनाने गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी असे तिन्ही दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. केवळ प्राथमिक माध्यमिक नव्हे तर सर्व कॉलेज ना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या सह अनेक लोक प्रतिनिधी पालकांनी सुट्टीची मागणी केली होती त्यानुसार जिल्हाशिक्षण अधिकारी ए बी पुंडलिक यांनी तीन दिवस सुट्टीची मागणी करत जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांच्याकडे रिपोर्ट पाठवला होता त्यानुसार डी सी यांनी तीन दिवस सुट्टीचा आदेश बजावला आहे. रामदुर्ग तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्याना सुट्टीचा आदेश आहे.