नवीन सरकार दाखल होताच सर्वत्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. बेंगळुरू पोलीस मुख्यालयात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बेळगावमध्ये यापूर्वी काम केलेले अधिकारी महत्वाच्या पदांवर दाखल होत आहेत.
बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख पदी काम करून आपला मोठा प्रभाव पाडवलेले आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची आता अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन बंगळूर शहर या पदावर नियुक्ती झाली आहे. तर बेेेळगावात लोकप्रिय पोलीस म्हणून नाव लौकिक मिळवलेले संदीप पाटील हे जॉइन्ट पोलीस आयुक्त बंगळुरू हे पद मिळवले आहेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणूनच काम करून पुढे गेलेले डॉ बी आर रविकांतेगौडा यांची बंगळूर पश्चिमचे संयुक्त आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी तसेच बेळगावचे पहिले पोलीस आयुक्त ठरलेले भास्कर राव बंगळूर पोलीस आयुक्त पदी नियुक्त झाले आहेत. तर आणखी एक बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणूनच काम केलेले आणखी एक अधिकारी अलोक कुमार यांची एडिजीपी कर्नाटक राज्य राखीव दल येथे नियुक्ती झाली आहे.