बेळगावसह इतर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे हजारो कोटींची हानी झाली असताना राज्यातील मंदिरानी पूरग्रस्तांना 22 हजार साड्या पाठवल्या आहेत.
बेळगावातील रेणुका देवी मंदिराने 5 हजार तर गुलबर्गा येथील छत्रगी भाग्यवती देवस्थान एक हजार अश्या सोमवारी जिल्हा प्रशासनाला सोपवण्यात आल्या.बेळगावच्या डी सी ऑफिस समोर डी सी बोमनहळळी यांनी या साड्यांचा स्वीकार करत कार्यालयातील सामुग्री संग्रह केंद्रातून पूर ग्रस्त भागात पाठवून दिली.
बंगळुरू मैसूर रामनगर हसन चित्रदुर्ग कोलार आणि मांड्या मधून 8978 साड्या आल्या आहेत तर उडुपी मंगळूर मधून 3500 बळळारी कोप्पळ मधून 3500 हजार साड्या आल्या आहेत अशी माहिती धर्मदाय खात्याचे अधिकारी रवी कोटरगस्ती यांनी दिली. यावेळी पोलिस आयुक्त लोकेशकुमार जिल्हा पं सी इ ओ राजेंद्र आदी उपस्थित होते