तुममुरगुद्दी जवळील तबलापूर येथे 48 तास झाडावर अडकलेल्या कल्लापा आणि रत्नवा यांची रेस्क्यू टीमने सुटका केल्यावर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
48 तासाहून अधिक काळ थंड हवेत एकच ठिकाणी झाडावर बसून राहिल्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाली होती.यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जावून कल्लाप्पा आणि रत्नवा या दाम्पत्याची भेट घेतली.
यावेळी या दांपत्याने दिवसरात्र झाडावर बसून एकमेकांना धीर देऊन कसा वेळ घालवला याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.