मागील अनेक वर्षापासून मागणी करण्यात आलेल्या धारवाड कित्तूर बेळगाव या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात सुरू आहे . राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून याला पुन्हा चालना मिळाली असून येत्या दोन महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे मंत्री यांच्या सूचनेवरून या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून मागील अनेक वर्षापासून हा सर्वे बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता पुन्हा चालना मिळाल्यामुळे त्यातून समाधान व्यक्त आहे यामुळे प्रवाशांना सोयीचा असा प्रवास मिळणार आहे
येत्या 2 महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.
धारवाड उच्च न्यायालय, कित्तूर आणि हिरेबागवाडी येथे रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. लवकरच या स्थानकांनाही चालना देण्यात येणार असून पहिल्यांदा धारवाड येथील प्रवाशांची सोय करून त्यानंतर इतर कामांकडे लक्ष देण्यात येणार आहे
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांनी पत्रकारांना सांगितले की, “धारवाड-कित्तूर-बेळगाव रेल्वे मार्ग राज्य सरकारच्या सहकार्याने तयार केला जाईल. हा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यात हा सर्वेक्षण पूर्ण करून रेल्वे मार्गांना चालना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे
रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी बेळगाव आणि उत्तर कर्नाटकला फायदा होईल असे अनेक प्रकल्प राबवले आहेत. बेळगाव ते बेंगळुरू या थेट सुपर फास्ट रेल्वेने बर्याच वर्षांपासून मागणीची पूर्तता केली जाणार आहे
बेळगाव रेल्वे स्थानक विकसित करण्याचे आदेश देण्यात आले असून गुडशेड सांबरा येथे हलविण्यात आले आहे. दक्षिणेकडून बेळगाव रेल्वे स्थानकात प्रवेश उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.