सेंट मेरीज हायस्कुलचे विद्यार्थी आणि स्टाफने पुरात ज्यांची घरे गेली अशा कुटुंबांना मदत केली.पूर भागाचा दौरा करून अति गरज असलेल्या कुटुंबांची यादी काढण्यात आली होती. 30 कुटुंबे गरजू असल्याचे लक्षात आल्यावर मदत जमवण्यात आली.
मदतीची वस्तू असलेल्या किट तयार करून कोनवाळ गल्ली , शिवाजी रोड, मुजावर गल्ली व परिसरातील नागरिकांना ही मदत देण्यात आली.
शाळेच्या प्राचार्य जसमीन रबडी यांच्या मार्गदर्शनावाखाली हे सामाजिक कार्य हाती घेण्यात आले होते.विशेष म्हणजे या शाळेच्या बाजूला असलेल्या कोनवाळ गल्ली नाल्यामुळे प्रभावित पुरग्रस्तांना ही मदत देण्यात आली आहे.