सर्व यंत्रणा आपल्या सोयीसुविधा सोशल मीडिया च्या मार्फत लोकांसमोर पोहोचवत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणून नैऋत्य रेल्वे ही देशातील मोठी रेल्वे यंत्रणा आता ट्विटर वर आली आहे.
आपल्या नव्या रेल्वे योजनांची माहिती ट्विटर मार्फत आपल्या प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचे काम आता ही रेल्वे करणार आहे. ट्विटर एक चांगले सामाजिक माध्यम म्हणून ओळखले जाते. त्या माध्यमातून अनेक जण एकमेकांच्या संपर्कात असतात. मोठ्या व्यक्ती, सेलिब्रिटी आणि व्हीआयपींनी आपले ट्विटर खाते खोलून आपल्या बद्दलचे मिनिटामिनिटा ची माहिती समाजासमोर उपलब्ध केली आहे.
यावरच एक पाऊल ठेवून नैऋत्य रेल्वेने आपले ट्विटर अकाऊंट सुरू केले असून त्यावर सर्व प्रकारची माहिती दिली जात आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. रेल्वे वेळापत्रक, रेल्वे वेळापत्रकांमध्ये बदल ,नवीन रेल्वे ची घोषणा, नवनव्या योजना यांची माहिती घरबसल्या आपल्या मोबाईलवर प्रवाशांना मिळणार आहे.