मागील दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आणि ठीकठिकाणी कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे मात्र ती निवारणासाठी महानगरपालिकेने कोणतेच प्रयत्न केले नाहीत याचा विचार गांभीर्याने करून गणेशोत्सवाच्या आधीच कचरा समस्या दूर व्हावी अशी मागणी होत आहे
अवघ्या अठरा दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवमुळे सारेजण तयारीला लागले आहेत मात्र उपनगर आणि शहरांमध्ये कचऱ्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे गणेशोत्सवापूर्वी ही समस्या सोडविण्यास आणि ठिकाणी होणारे रोग राई नष्ट होणार आहे याचा विचार महानगरपालिकेने करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे
शहराचा विस्तार वाढला आहे तसेच लोकसंख्या वाढ झाली आहे लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक गल्लीत किमान दोन ते तीन ठिकाणी कचराकुंडी ठेवणे आवश्यक आहे मात्र तसे होत नसल्याने अनेक वॉर्डात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे गल्लीचा कोपऱ्या कोपऱ्यावर कचरा फेकण्याची प्रकार वाढले आहेत त्यामुळे कचरा समस्या त्वरित सोडावे अशी मागणी होत आहे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गल्लोगल्ली मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे वाहतुकीला अडचण होत असते तर रस्त्यावरच कचरा फेकण्यात येत असल्याने आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो गणेशोत्सव काळात ही कचरा स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज असून महानगरपालिकेने कचरा गोळा केल्यास समस्या सुटणार आहे मात्र तसे होताना दिसत नाही त्यामुळे गणरायांचे आगमन होण्यापूर्वी कचरा नष्ट होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच ही समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे