जनतेने निवडून दिलेल्या ज्या लोकप्रतिनिधींवर कारवाई झाली आहे त्यांना आगामी निवडणुकीत जनताच धडा शिकवेल असे मत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडले.मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी पूरग्रस्त भागाचा त्यांनी दौरा केला त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
जनतेने त्यांना निवडून देऊन दिलेल्या जनादेशाचा त्यांनी अवमान केला आहे.हा जनतेचा अपमान आहे.कागवाड मतदारसंघातून आम्ही श्रीमंत पाटील यांना काँग्रेसमध्ये निवडून आणले.यापूर्वी ते जनता दलातून पराभूत झाले होते असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ते बेळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते.
उमेश कत्ती यांनी माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे विचारपूस करण्यासाठी फोन केला होता.डी. के.शिवकुमार आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत असेही सिद्धरामय्या म्हणाले.विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना उपमुख्यमंत्री पद दिलेत त्यामुळे भाजपला लाज आहे का?असा सवाल करत त्यांनी भाजपा मधील धुसफूस सुरू आहे ती कधीही बाहेर येऊ शकते असेही ते म्हणाले.