माझ्यावर आरोप करणारे भाजप हाय कमांडच्या हातातील बाहुले आहेत.अमित शहा येडीयुरप्पा यांची भेट घेत नाहीत.अमित शहा सांगतील त्याप्रमाणे कर्नाटक भाजपचे कार्य चालते असा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.बेळगाव शहरात बुधवारी सकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली.
केंद्र सरकार राज्य सरकारला सापत्न भावाची वागणूक देत आहे.राज्यात भीषण पूरस्थिती येऊन गेली तरी अद्याप केंद्राने रुपयाही दिला नाही.25 खासदारांना राज्यातील जनतेने निवडून देऊन काय उपयोग?मोदींना परदेश दौरे करायला वेळ आहे पण पुरबाधित प्रदेशांना भेट द्यायला वेळ नाही.पुरामुळे नुकसान खूप झाले असून केंद्राने त्वरित पाच हजार कोटींची मदत द्यावीअशी मागणीही सिद्धरामय्या यांनी केली.
भाजपला सरकार चालविण्यासाठी जनाधार नाही.राज्यातील भाजप सरकार म्हणजे अनौरस संतती आहे अशी टीकाही सिद्धरामय्या यांनी केली.काँग्रेस सरकार खेचण्याच्या ऑपरेशनचे सूत्रधार ईश्वरप्पा यांनी टीका केली आहे.
ईश्वरप्पा हे मूर्ख नाही तर शतमूर्ख आहेत.त्यांची जीभ आणि मेंदू यांचा संबंध नाही असेही सिद्धरामय्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.पत्रकार परिषदेला सतीश जारकीहोळी, माजी खासदार प्रकाश हुक्केरी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.