Sunday, November 3, 2024

/

‘मदतीला धावणारी शिवप्रतिष्ठान’

 belgaum

गेल्या काही दिवसा पासून सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव शहर आणि परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे शहरातील रस्त्यावर पावसाचे पाणी ओसंडून वाहत आहे.

अनेक गल्ली उपनगर पाण्याखाली गेली आहेत हजारो घरातून पाणी घुसले आहे अश्यात बेळगावं महापालिका हतबल झाली आहे मात्र संयमी बेळगावकर जनतेने युवकांनी समाजसेवी संघ संस्थांनी पुढाकार घेत एकमेकांना मदतीचे हात दिले आहेत.अश्याच अनेक संघटना पैकी शिव प्रतिष्ठान या संघटनेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे

या संघटनेच्या च्या वतीने पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी जाऊन मदत कार्य करण्यात आली. मराठा मंदिर, जक्कीन होंडा, यशोदा हॉस्पिटल येथील रुग्णांना व वृद्धांना अग्निशमन दलाच्या मदतीने बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.पुरात घरांची पडझड होऊन व पाणी शिरून बेघर झालेल्या लोकांना खासबाग संभाजी रोड येथे आश्रय देण्यात आला. शास्त्री नगर येथील शिवाजी रेडेकर यांना अपूर्वा हॉस्पिटल दाखल करण्यात आले.या शिवाय शास्त्रीनगर, कपिलेश्वर कॉलनी टिळकवाडी विविध भागात मदत कार्य राबवण्यात आले.

तिरुपती येथे दर्शनास गेलेल्या कोल्हापूर येथील नागरिकांची रेल्वे समुदाय भवनात सोय करण्यात आली बेळगाव शहरा बरोबरच तालुक्यातील गावामध्ये शिवप्रतिष्ठानचे धारकरी मदतकार्यात गुंतले होते.पाण्यात 25 ते 30 फेऱ्या आम्ही घातल्या दिवसभर पाण्यात आहोत उद्या पण मदत सुरूच असणार आहे दिवसभर पाण्यात राहून हात पांढरे झालेत अशी प्रतिक्रिया एका प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याने बेळगाव live कडे बोलताना मांडली. केवळ नवरात्रीला दौड मध्ये चाळीस हजार लोक पळतात अन वर्षभर गप्प बसतात हा आरोप त्यांनी पुसून काढलाय हे मात्र नक्कीच..

यावेळी जिल्हाप्रमुख किरण गावडे, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख चंद्रशेखर चौगुले, अंकुश केसरकर, नामदेव पिसे, गजानन पाटील, प्रफुल शिरवळकर, रत्नप्रसाद पवार, गजानन बाडीवाले, नरेश जाधव,योगेज जाधव, राजू शहापूरकर, विनायक ऊसलकर, सागर पवार, महेश जाधव, प्रसाद केसरकर, अभीराज गावडे यासह इतर कार्यकर्ते सहभाग दर्शवला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.