बेळगाव शहरात दोन ठिकाणी मटका घेणाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी रोख रक्कम जप्त करत एकूण 11 जणांना अटक केली आहे. ए सी पी भरमनी यांच्या नेतृत्वात खंजर गल्ली मोडका बाजारात धाड टाकून 8 जणांना तर शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वात नार्वेकर गल्ली भंगी बोळात धाड मारून तिघांना अटक करण्यात आली आहे.
खंजर गल्लीत मटका घेणाऱ्या आठ जणांना अटक 1 फरारी चा शोध सुरू आहे.ए सी पी नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज मटका घेणाऱ्या आठ जणांना अटक केली असून एक फरार आहे. त्यांच्याकडून 21680 रोख रक्कम व मटक्याची सामग्री जप्त करण्यात आली आहे.बेळगाव शहरातील खंजर गल्ली परिसरातील के ई बी कार्यालय जवळ बोळात अनधिकृतपणे सार्वजनिक व्यक्तींकडून मटका घेत असताना माहिती मिळाल्यावरून धाड घालूनएस व्ही पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही कारवाई करण्यात आली आहे.
रवी प्रभाकर शानभाग (महादेव गल्ली बेळगाव)अशोक इराप्पा हपन्नावर (माळापूर धारवाड)संजय परशुराम खडाटे (ओल्ड गांधीनगर)आडीवेप्पा बसवणेपा उरब्यानट्टी (अक्कतंगेरहाळ)हारून रशीद खाजी (शहापूर)
जॉन अंथॉन फर्नांडिस (हनुमान नगर)गुरुनाथ अय्यप्पा भिमानहल्ली (वंटमुरी कॉलनी)सोहेल महम्मद हुसेन गवंडी (चिराग नगर) यांना अटक करण्यात आली असून फरार फाईम जीलानी (कोतवाल गल्ली) याचा शोध सुरू आहे.
शहापूर पोलीस निरीक्षक जावेद यांच्या नेतृत्वाखाली नार्वेकर गल्ली भंगी बोळात मटका घेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून तिघांना अटक करून त्यांच्या जवळील 12500 रुपये रोख रक्कम जप्त केली. पोलिसांनी आकाश सहदेव मॅगिनमनी वय 26 रा.हरीजनवाडा शहापूर बेळगाव यांला अटक करून त्याच्या जवळील मटका चिट्टी व 6200 रोख, रमेश वेरणेकर वय 41 रा. संभाजीनगर वडगांव याना अटक करून त्याच्या जवळील अंक लिहिलेल्या चिट्टी 3300 रोख रक्कम आणि सुभाष रामन्नावर वय 52 रा बाळेकुन्द्री त्याच्या जवळील 2700 रुपये जप्त केले आहेत.
रमेश वेरणेकर याला सर्वप्रथम अटक करून विचारणा केली असता त्याने सहदेव साठी आपण मटका घेत असल्याचे कबूल केले त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.शहापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.