निलजी गावातील भरत पाटील आणि त्यांच्या मित्र समूहाने गणेशोत्सवात नागरिकांना मदत होईल अशी व्यवस्था केली आहे. फक्त गणपती आणायचा आणि त्यासाठी लागणारे सगळे साहित्य घरपोच पोहोचण्याची व्यवस्था हे युवक करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ही सेवा त्यांनी सुरू केले असून गणेशोत्सवात लागणारा घरगुती प्रकारच्या धार्मिक आणि इतर सर्व साहित्याची पोच ते घरात देतात. ना नफा ना तोटा या तत्वावर हे काम केले जात आहे.
बरेच लोक आपापल्या कामांमध्ये गुंतलेले असतात. अशावेळी गणपतीचे साहित्य आणायला त्यांना वेळ मिळत नाही .गणपती दिवशी धावपळ होते. त्यामुळे फक्त गणपतीची मूर्ती बुकिंग करायचे आणि बाकीचे साहित्य हे पुरवतात अशी व्यवस्था त्यांनी केली आहे .
निलजी, मोदगा, हलगा -बस्तवाड या भागात ते हे काम करत आहेत. भरत हे श्री राम सेना हिंदुस्तानचे तालुका प्रमुख असून आपले मित्र व कार्यकर्त्यांना घेऊन त्यांचे काम सुरू आहे.