बेळगावच्या मदिना मशिद रिलिफ फंडाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत निधी जमविण्याचे काम आणि वाटण्याचे काम जोरात सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोक वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात मदत आणून देत आहेत आणि ती पूर आलेल्या वेगवेगळ्या भागात वाटली जात आहे. हे काम सुरू असतानाच बेळगावातीळ मुस्लिम समाजातील युवक संघांनी याच रिलीफ फंडाच्या माध्यमातून अनेकवाहन घेऊन शहरातील स्क्रॅप च्या वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
अंजुमन हॉलच्या पाठीमागील भागात या वस्तू जमवल्या जात असून या वस्तूंच्या विक्रीतून जमणार्या पैशातून पूरग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. ठीक ठिकाणावरून येणारी मदत कमी पडत आहे मात्र आपल्याकडे असलेल्या टाकाऊ वस्तू अल्प मूल्यात विकण्यापेक्षा आमच्याकडे द्या त्या वस्तू एकत्रित रित्या विकून आलेल्या पैशातून पूरग्रस्तांना कायमची मदत आम्ही करू असे आवाहन या कार्यकर्त्यांनी केले असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
15 आगष्ट रोजी स्क्रॅप एकत्रित करण्याचे काम जोरात सुरू होते शहराच्या प्रत्येक भागातून स्क्रॅप गोळा केले जात असून कित्येक टन स्क्रॅप जमा झाले आहे. स्क्रॅप किती जमा झाले त्यातून किती पैसे आले आणि त्यातून किती जणांना मदत देण्यात आली हा सारा व्यवहार पारदर्शकपणे जनतेसमोर मांडला जाईल.
त्यामुळे कोणत्या प्रकारचा संशय न बाळगता स्क्रॅप देऊन सहकार्य करा. असे आवाहन मदिना मशिद रिलिफ फंडाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची दखल घेऊन स्तुती केली असून मुस्लीम समाजाच्या माध्यमातून बेळगाव शहरात मोठे काम करण्यात येत आहे.