पूर परिस्थितीने अनेकांची घरे उधवस्थ केली, हजारोंचे संसार उघड्यावर आणले आता जांबोटी येथील संपूर्ण शाळा या पावसाने नष्ट केली आहे.या शाळेच्या संपूर्ण इमारतीला तडे गेले असून या शाळेची इमारत शिकवण्या योग्य नाही.कर्नाटक सरकारने 15 ऑगस्ट पर्यंत सर्व शाळांना सुट्टी दिली आहे. पण सुट्टी संपली की शाळा सुरू झाल्यावर 16 ऑगस्ट पासून जाण्यासाठी जांबोटी च्या त्या विद्यार्थ्यांना शाळा नाही.
बेळगाव जिल्हा प्रशासनाने या मुलांना लवकरात लवकर हक्काची शाळा उपलब्ध करून द्यावी ही मागणी होत आहे. बेसुमार पावसाने शाळेची इमारत जमीनदोस्त केली आहे. पूर व पावसाने शिक्षण देणारे हे मंदिर नष्ट केले असून विद्यार्थी ज्ञानापासून पोरके झाले आहेत.नवीन इमारत तयार होई पर्यंत या गावात मंदिर किंवा मठात शाळा भरवण्याची गरज बनली आहे.
जिल्हा पंचायत आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी या शाळेची पहाणी केली यावेळी शिक्षक संघटनेचे एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.तात्काळ या शाळेसाठी निधी मंजूर करू असे आश्वासन रमेश गोरल यांनी दिले आहे.