पावसाच्या सुरुवातीला केवळ छत कोसळून विद्यार्थिनी जखमी झालेली गोजगा येथील मराठी प्राथमिक शाळेची इमारत देखील पूर्ण पणे कोसळली आहे.मार्कन्डेय नदीला आलेला पूर आणि बसुरते धरण फुटल्याने पश्चिम भागात जमिनीला उंबळ लागली आहे. गोजगा मन्नूर आंबेवाडी गावचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.
शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान गोजगा शाळेची इमारत जमीनदोस्त झाली आहे.शाळेचे छत कोसळले त्यावेळी जिल्हा पंचायत शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल व सदस्या सरस्वती पाटील यांनी शाळेला भेट देऊन नवीन आराखडा करण्याचे आश्वासन दिले या शिवाय गावातील मंदिरात तात्पुरती शाळा भरविण्याच्या सूचना केल्या होत्या.
केवळ शाळाच नव्हे तर अनेक घरांची पडझड देखील या भागात झाली आहे.आता शासनाने त्वरित आराखडा तयार करून नवीन शाळा उभारण्याची गरज आहे. छत कोसळली बेळगाव live ने केलेली बातमी खालील लिंक वर वाचू
शकता.