भाजप पक्षाने मंत्रिपद न देता ज्येष्ठ नेते उमेश कत्ती यांचा अपमान केला आहे .त्यामुळे ते नाराज आहेत अशा परिस्थितीत पक्ष बदलासाठी डेडलाईन सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना दिली आहे.
उमेश कत्ती नेमक्या कुठल्या पक्षात जातात याकडे लक्ष असताना काँग्रेस नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसमध्ये येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे आमंत्रण दिले आहे.
यमकनमर्डी मतदारसंघांमध्ये दौरा करत असताना पत्रकारांशी बोलताना आमंत्रण दिले आहे. ते आमच्या पक्षात येत असतील तर मी स्वागत करतो असेही जारकीहोळी म्हणाले असून कत्ती नी काँग्रेस प्रवेशाची तयारी केली का? अशी चर्चा होत आहे.
सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा उमेश कत्ती यांच्या पक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे.या अगोदर सतीश जारकीहोळी आणि उमेश कत्ती यांचे हितसंबंध बेळगावातील राजकीय क्षेत्रात नवीन नाहीत डी सी सी बँकेत जारकीहोळी आणि कत्ती एकच असतात हे याअगोदरचे गणित होते त्यात सतीश यांनी कत्ती यांना काँग्रेस मध्ये येण्याचे आमंत्रण देऊन कत्ती जारकीहोळी संबंध आणखी मजबूत करण्याकडे एक पाऊल टाकले आहे.