माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कंग्राळी खुर्द ते अलतगा क्रॉस पर्यंतच्या रस्त्याची पहाणी करत आगामी ऑक्टोबर नंतर याचे काम सुरू करू असे आश्वासन दिले.
जारकीहोळी यांच्या अश्वासना मुळे गेली तीन वर्षां पासून कंग्राळी ग्रामस्थ आंदोलन करत असलेल्या या रस्त्याच्या कामा बद्दल पुन्हा एक आश्वासन मिळालं आहे.मार्कंडेय नदीच्या पुरामुळे अलतगा कडोली भागातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत ब्रिज खचली आहेत घरे कोसळली आहेत अश्या भागाचा दौरा करत पहाणी केली पावसाने अलतगा कडोली भागाचा संपर्क देखील तुटला होता.
जारकीहोळी यांनी कडोली जिल्हा पंचायत मतदार संघाचा दौरा करत पडझड झालेली घरे,खराब झालेले रस्ते,ब्रिजांची पहाणी केली. अलतगा येथील पडलेल्या घरांची पहाणी करून पूर ग्रस्त पीडित लोकांना अन्न धान्य जीवनोपयोगी वस्तुंची मदत केली.अलतगा अगसगा म्हाळे नट्टी हंदिगनूर कडोली जाफरवाडी देवगिरी आदी गावांची भेट देऊन पहाणी केली.