पुरात अडकलेल्या लोकांचे जीव वाचवून त्यांना सुरक्षित स्थळी हलवणारे व बचाव कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या मराठा लाईट इंफंट्रीच्या जवानांनी बकरी ईद च्या विशेष प्रार्थनेत मध्ये सहभागी होऊन एकतेचे उदाहरण दिले आहे.
सोमवारी दुपारी बारा हुन अधिक जवानांनी रायबाग तालुक्यातील शिरागुर गावात बकरी ईद च्या विशेष प्रार्थनेत सहभाग घेतला होता.गेल्या आठवडाभरा पासून चिकोडी ,अथणी आणि रायबाग तालुक्यात मराठा सेंटरच्या जवानांनी महा पुरातून साहसीपणा दाखवत हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत. याची दखल घेत शिरागुर गावच्या मुस्लिम बांधवांनी जवानांना दुपारी भोजनाचे आमंत्रण दिले होते त्यानुसार जवानांनी मुस्लिम बांधवां सोबत सहभोजन केले.
या जवानांचे नेतृत्व करणाऱ्या मेजर राजपाल सिंह राठोड व जवानांनी यांनी भोजन घेत ईद च्या विशेष प्रार्थनेत देखील सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने जीव वाचवणाऱ्या या जवानांचे मुस्लिम बांधवांनीही कौतुक केले आहे. जवानांचे मुस्लिम बांधवां सोबत भोजन आणि सामूहिक प्रार्थनेत सहभाग या गोष्टी सौहार्द वाढवणाऱ्या आहेत.
मुसगुप्पी गावात 15 फूट खोल पाण्यात अडकलेल्या महिलेला जीवनदान देत पोहून सुरक्षितरीत्या बाहेर काढले होते त्याच मेजर राठोड यांच्या साहसाचे विशेष कौतुक होत असून त्यांनीच या सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला होता.जवानांचे हे उदाहरण देशात धार्मिक सलोखा जपाण्यास आणि वाढण्यास प्रेरणा देणारे आहे.