जिल्हा मुख्य न्यायाधीशांना बेळगाव बार असोशियशन ने एक विनंती पत्र दिले असून आज व उद्याच्या अनुपस्थिती बद्दल पूर्वसूचना देऊन पावसाने काही वकील व नागरिक अनुपस्थित राहिल्यास विरुद्ध निकाल देऊ नये अशी विनंती केली आहे.
पाऊस जोर आहे. यामुळे वकिलही अडकू शकतात. अनेक वकील व नागरिकांना न्यायालयात उपस्थित राहणे अशक्य आहे. याचा विचार व्हावा अशी विनंती जनरल सेक्रेटरी प्रवीण अगसगी यांनी केली आहे.
मंगळवारी आणि बुधवारी बेळगाव खानापूर तालुक्यातील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली असून बेळगावं व खानापुरात महापूर आला आहे. सगळी कडे जनजीवन विस्कळीत झाले आहे.