मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.आपले घर नातेवाईक यांच्यापासून दूर राहून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनी राखी बांधून आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
सीमेवर तसेच देशातील विविध भागात आपल्या घरादारापासून दूर राहून सेवा बजावणाऱ्या सैनिकांना राखी बांधणे हे आमचे कर्तव्य असल्याची भावना शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केली.जैन कॉलेज,भरतेश स्कुल आणि लव्हडेल स्कुलच्या विद्यार्थिनींनी जवानांना राखी बांधून त्यांना मिठाई भरवली.
आमचे रक्षण करतात त्यांना राखी बांधणे ही आपली परंपरा आहे.त्यामुळेच देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आम्ही राखी बांधण्यासाठी आलो आहोत अशी भावना विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांनी व्यक्त केली.मराठा लाईट सेंटरमध्ये दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.