वरुणराजाने घातलेले थैमान आवरण्यासाठी बेळगावच्या कंग्राळ गल्लीतील काही नागरिकांनी विशेष पूजा केली आहे. या पूजेच्या माध्यमातून वरुण देवाला आता थांब अशी विनंती या भाविकांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, गजानन देवरमनी आणि इतर एका खुल्या विहिरीजवळ जमा झाले होते. त्यांनी या ठिकाणी पूजा केली. यावेळी परिसरातील नागरिक महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष हलगेकर, सिद्राय मेत्री आणि देवेंद्र चौगुले यांनी याबद्दल चे महत्व सांगितले. आम्ही वरूणराजाला भाकणूक करून त्याला शांत करू शकतो. त्यासाठीची ही पूजा आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दरवर्षी पाऊस येत नाही म्हणून पावसाची भाकणूक करण्यासाठी पूजा केली जाते. या वर्षी या पद्धतीने पूजा झाली होती. एकदा आलेला पाऊस जाण्याचे नाव काढेना, त्यामुळे ही पूजा करावी लागल्याची माहिती देण्यात आली आहे.