मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एपीएमसी परिसरात कोणताच व्यवहार होणे बंद झाले होते. त्यामुळे अनेकांवर बेरोजगाराची वेळ आली होती. तर पडलेल्या पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले होते. यामुळे वाहने ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता पावसाने उघडीप दिल्यामुळे एपीएमसी चा कारभार पूर्वपदावर येत आहे.
एपीएमसी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील सर्व व्यवहार ठप्प होते. विशेष करून महामार्ग आणि इतर भागातून येणाऱ्या बटाटा कांदा व इतर साहित्याची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे येथील व्यवहार बंद पडले होते. याचा फटका व्यापारी हमाल आणि इतर किरकोळ व्यापाऱ्यांना बसला होता.
बेळगाव एपीएमसी मार्केट हे तीन राज्यांना जोडलेले मोठे आहे. या मार्केटमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील व्यापारी तसेच दिल्ली राजस्थान, पंजाब आधी शहरातील व्यापारीही ये-जा करत असतात. मात्र पावसामुळे हे सारे व्यापारी आहे त्याजागी होते मात्र आता येथील व्यवहार पूर्वपदावर येत आहे.
हा व्यवहार बंद असल्याने व्यापाऱ्यांना आणि येथील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये मागील काही दिवसापासून व्यवहार ठप्प असल्याने याचा परिणाम बेळगाव शहरावर ही झाला आहे. विशेष करून इतर राज्यांना पुरवठा करणाऱ्या साहित्यावर आणि वाहतुकीलाही मोठा फटका बसला होता. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे एपीएमसी येथील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.