केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी पुराच्या नुकसानभरपाई बाबत कोणतीही मोठी घोषणा केली नाही.
बेळगाव आणि बागलकोट जिल्हयातील पूर परिस्थिती गंभीर आहे.पुराने परिस्थिती गंभीर बनली आहे.कृष्णा,घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांना पूर आल्यामुळे पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पिकाचे नुकसान झालेल्यांना सध्या तात्पुरती मदत त्वरित देण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील.सर्वेक्षण करून नुकसान झालेली सगळी माहिती मिळाल्यावर पुन्हा भरपाई देण्यात येईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पीक विमा करण्याची मुदत वाढवून देण्यात येणार आहे.पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण त्वरित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.विणकर बांधवांना देखील त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात येणार आहे.ज्यांच्या घरांची पडझड झाले आणि नुकसान झाले त्यांनाही मदत देण्याचे आश्वासन सीतारामन यांनी दिले.बेळगाव भेटीच्यावेळी त्यांच्या समवेत अर्थासचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी होते.
3800 कुटुंबांना सुरक्षित स्थळी पोचवून आश्रय देण्यात आला आहे राज्य सरकार त्यांची काळजी घेत असल्याचं नमूद केलं.कृष्णा घटप्रभा आणि मलप्रभेचा प्रकोप त्यांनी एरियल सर्व्हे मधून अनुभवलअसल्याचं स्पष्ट केलं.