शहरातील सर्वच पोलीस स्थानकात आगामी गणेश उत्सवा निमित्त शांतता सभा घेण्यात येत आहेत प्रत्येक पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन करत आहेत.असे असताना शहरातील अति संवेदनशील असे मानल्या जाणाऱ्या पोलीस स्थानकातील शांतता बैठकीस वरिष्ठ अधिकाऱ्याने दांडी मारली आहे.
मार्केट पोलीस स्थानकात देखील शांतता सभा या भागातील गणेश मंडळांना बोलवण्यात आले होते या बैठकीस गणेश मंडळांनी तर अल्प प्रतिसाद दिलाच होता या शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही शांतता बैठकीकडे पाठ फिरविली होती.
पोलीस निरीक्षकां ऐवजी केवळ ए एस आय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सदर शांतता बैठक घेतल्याने याला प्रतिसाद मिळाला नव्हता.खरं तर संवेदनशील भागातील या पोलीस स्थानकात सी पी आय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेणे गरजेचे होते मात्र वरिष्ठ अधिकारी बैठकीत नसल्याने बैठकीचे गांभीर्य हरवले होते.
मार्केट पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात चव्हाट गल्ली खडक गल्ली कामत गल्ली शिवाजी नगर ओल्ड गांधी नगरचा काही भाग येतो हा भाग शहराचा संवेदनशील भाग म्हणून पहिला जातो या भागातील शांतता बैठकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.