विवस्त्र युवतीने मोटारसायकल चालवण्याच्या त्या घटनेबद्दल बेळगाव पोलीस आयुक्तालय गंभीरपणे चौकशी करत असल्याचे स्वतः पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांनी सांगितले आहे. त्या तरुणीविरुद्ध तक्रार दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आठवड्यापूर्वी बेळगाव शहरात घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पैज हरली म्हणून एका युवतीने पूर्णपणे विवस्त्र होऊन बेळगावच्या क्लब रोड वरून वाहन चालवले .अशी ती घटना खरोखरच मानवी विकृतीची परिसीमा गाठणारी घटना आहे. पैज हरली म्हणून विवस्त्र होऊन शहराच्या रस्त्यावरून वाहन चालवणे, हे कितपत योग्य असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय.
सध्या आंबट शौकिनांसाठी हा व्हिडिओ प्रसिद्ध होत असून मोबाईलवरून इकडून तिकडे व्हायरल होत आहे .मात्र तिने केलेले कृत्य चुकीचे असल्याचे म्हणणे समाजातील जाणकार आणि सुसंस्कृत लोक व्यक्त करत आहेत . या घटनेची वृत्ते माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांवरील दबाव वाढला आहे.
क्लब रोडवरील एका हॉटेलमध्ये पार्टी सुरु होती. पार्टीमध्ये पैज लावण्यात आली. ती पैज हरल्यानंतर ठरल्याप्रमाणे विवस्त्र होऊन गाडी मारण्याचा आग्रह तिच्यावर करण्यात आला आणि त्या युवतीने विवस्त्र होऊन हे वाहन चालवले आहे .पोलिसांनी त्या वाहनाचा आणि तिच्यासोबत असलेल्या पार्टीतल्या लोकांचा शोध घेऊन त्या युवतीवर आणि तीच्या साथीदारांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त झाली आहे . यामुळे पोलिसांना दखल घ्यावी लागली आहे.
वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्थांमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे. रात्री उशिरापर्यंत यांच्या पार्ट्या हॉटेलमध्ये सुरु असतात फक्त पार्ट्या केल्या जात नाहीत तर त्यावेळेस स्पर्धा आणि पैजा लावल्या जातात. त्या प्रकारामधून असे घडत असून बेळगावच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचा प्रकार होत आहे.
यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष दिले आहे. सुसंस्कृत बेळगावकर नागरिकांनी सोशल मीडियावर आवाज उठवल्याने पोलीस जागे झाले आहेत.पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांना माध्यमांनी या प्रकरणी विचारले असता यावर पोलीस गंभीर असून त्या युवतीचा शोध घेतला जात आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.