आगामी गणेश उत्सवात फटाके वाजवत पैश्याचा अपव्यय टाळा पूर ग्रस्तांना मदत करा या मध्यवर्ती गणेश महामंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असत असताना पोलीस खात्यानेही उत्तर भागातील गणेश मंडळांना डॉल्बी आणि फटाकडे वाजवू नका पैसे वाचवून तेच पैसे पूर ग्रस्तांना मदत करा असे आवाहन केले आहे.
मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकित डॉल्बी लावू नका फटाके वाजवू नका मात्र सण उत्साहात शांततेत साजरा करा असे आवाहन केले मंडळानी पैश्याचा अपव्यय टाळून तोच पैसा पुग्रस्तांना मदत करा असेही आवाहन केले आहे.
या महिन्यात झालेल्या पावसाने बेळगाव खानापूर गोकाक चिकोडी अथणी कोवाड कोल्हापूर सांगली भागात प्रचंड नुकसान झाले याअगोदर अनेक सामाजिक संघटनांनी या भागात मदत करायला सुरुवात केली आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यात 950 हुन अधिक तर खानापूर तालुक्यात 500 हुन अधिक घरे कोसळली आहेत अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत अश्या बेळगाव खानापूरतील कुटुंबांना इथल्या गणेश मंडळांनी आपापल्या परीने आर्थिक मदत देणे गरजेचे बनले आहे.
बेळगाव पोलिसांनी देखील मध्यवर्ती गणेश महा मंडळाच्या पाठोपाठ शहरातील मंडळांना डॉल्बी विरहित फटाके विरहित गणेश उत्सव साजरा करा काटेकोर पणे पैसे खर्च करा पैश्याचा अपव्यय टाळा पीडितांना मदत करा असे आवाहन केले आहे.