प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये.मंडप बंद नसावा.भक्तांना मंडपात प्रवेश करण्यासाठी पुरेशी जागा असावी.मंडप उभारण्यासाठी संबंधित पोलीस स्थानक आणि महानगरपालिकेकडून परवानगी घ्यावी.
आणीबाणीच्या प्रसंगी अग्निशामक दलाची वाहने जावू शकतील याची काळजी घ्यावी.वीज मंडळाकडून वीज पुरवठा अधिकृतपणे करून घ्यावा.बेकायदेशीररित्या वीज जोडून घेऊ नये.मंडपाच्या सभोवती प्रखर उजेड देणारे दिवे लावावेत.पुरुष आणि महिला याना दर्शन घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.विजेचे खांब,टेलिफोनचे खांब यावर पताका लावू नयेत.
मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची यादी पोलीस स्थानकात द्यावी.मंडपात ध्वनिवर्धक लावण्यासाठी पोलीस खात्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.ध्वनिवर्धक सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच वापरावे.अश्लील गाणी ध्वनिवर्धकावर लावू नयेत.विसर्जन मिरवणुकीच्यावेळी दोन गटात तेढ निर्माण होईल असे फलक,भित्तीपत्रके लावू नयेत.दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून बळजबरीने वर्गणी वसूल करू नये.
डॉल्बीच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.अचानक आगीची घटना घडल्यास उपयाययोजना म्हणून बॅरेल मध्ये पाणी आणि बादलीत वाळूची व्यवस्था करून ठेवावी असे नियम पोलिसांनी गणेशोत्सव मंडळासाठी जाहीर केले आहेत.