अलारवाड येथे सांडपाणी प्रकल्पासाठी 50 एकर जमीन घेऊन हा प्रकल्प अर्धवट टाकण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली पुन्हा हलगा येथे जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. त्याविरोधात बेळगाव शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे .अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
स्वतः नारायण सावंत ,पत्रकार प्रसाद प्रभू आणि इतर पाच जणांनी ही याचिका दाखल केली आहे .येथील सांडपाणी प्रकल्पासाठी बजावण्यात आलेल्या भूसंपादनाच्या नोटिसा रद्द करण्यात याव्यात. अलारवाड येथे प्रकल्प उभारण्यासाठी महानगरपालिकेने जमा केलेले दोन कोटी चार लाख रुपये कुठे गेले याचा हिशोब द्यावा.
तसेच अलारवाड येथील प्रकल्प अर्धवट का टाकण्यात आला याचे उत्तर देऊन तो परत सुरू करण्यात यावा ,अशी मागणी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
न्यायालयाने कर्नाटक राज्य बेळगाव मनपा, पाणी पुरवठा विभाग आणि भूमापन अधिकार्यांना नोटीस पाठवली आहे. 20 ऑगस्ट ला पुढील सुनावणी होणार आहे .