मागील वर्षी सुद्धा मोहरम आणि गणेश उत्सव एकत्र साजरे झाले होते यावेळी ही हे सण शांततेत साजरे करा असे आवाहन पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी केले आहे.
सोमवारी सायंकाळी पोलीस समुदाय भवनात गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोहरम आणि गणेश उत्सवा संदर्भात शांतता सभेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त अशोक धूडगुंटी,पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,यशोदा वंटगुडी होत्या
गणेश उत्सव काळात गणेश मंडळांनी धार्मिकतेवर भर द्यावा सण उत्साहात साजरा करावा सरकारी यंत्रणा पुरग्रस्तांच्या मदतीत गुंतलेली आहे जनताच या पुरात अडकलेली आहे हे ध्यानात ठेऊन पोलीस प्रशासन गणेश उत्सवात जनतेला सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
गणेश मंडळांची परवानगी असो किंवा कोणतीही गोष्ट अडवून ठेवली जाणार नाही प्रशासन सहकार्य करेल कुणीही कायदा हातात घेऊ नये त्यासाठी गणेश मंडळांनी देखील सहकार्य करावे असे त्यांनी नमूद केले.रात्रीच्या वेळी गणेश भक्तांना बस सुविधा असोत किंवा हॉटेल सुरू करण्याची परवानगी असोत मागील वर्षी प्रमाणे गणेश महा मंडळाच्या मागणीनुसार सर्व सुविधा पुरवल्या जातील.असेही ते म्हणाले.
लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्ते डागडुजी करण्याचे आदेश कंत्राटदार याना दिले आहेत लवकरच रस्ते दुरुस्ती सुरू करू असे आश्वासन पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिले.यावेळी पोलीस अधिकारी गणेश महा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.