बेळगाव शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यावर पावसाने खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांवर अपघात होत आहेत. पाणी असताना अंदाज येत नसल्याने वाहन चालक पडून जखमी होतात.
वाहने पंक्चर होणे व खराब होणे या घटना वाढल्या आहेत. यावर बेळगावच्या रहदारी पोलिसांनी चांगला मार्ग काढला आहे. प्रत्येक रहदारी पोलिसाने एक खड्डा मुजवण्याचा संकल्प केला आहे व कामाला सुरुवात केली आहे.
बेळगाव उत्तर रहदारी पोलिस निरीक्षक आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.आज पावसाने उघडीप दिल्याने पोलीस कामाला लागले. त्यांनी खड्डे मुजवून अपघात टाळण्यासाठी काम सुरू केले आहे. कनकदास सर्कल येथे ही खड्ड्यात पेव्हर्स घालून मुजवण्यात आले आहेत.
पोलिसांनी जो पुढाकार घेतला आहे तसाच इतर खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी घेतला तर दोन दिवसात सगळे खड्डे मुजवून टाकता येतील.