शिवाजीनगर पंजीबाबा आणि वीरभद्र नगर भागात किल्ला तलावाचे पाणी घुसून आलेल्या पुरा नंतर बंद करण्यात आलेला विद्युत पुरवठा अद्याप सुरू करण्यात आलेला नाही त्यामुळे याचा त्रास या भागातील जनतेला होत आहे.
हेस्कॉमचे अधिकारी या बाबतीत केवळ आश्वासने देत आहेत त्वरित खंडित केलेला वीजपुरवठा बहाल करा अन्यथा शुक्रवारी तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी दिला आहे.
या भागातील वीज पुरवठा बंद असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे पाणी टंचाई असल्याने मीटर शिवाय पाणी मिळणे कठीण बनले आहे अश्यात लोकांचे बेहाल होत आहेत जर का शुक्रवारी वीज पुरवठा सुरू झाला नाही तर नाईलाजाने आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा देखील माजी उपमहापौर यांनी दिला आहे.