बेळगाव शहरातील नियती फौंडेशन या संघटनेने पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम जोरात सुरू केले आहे. या कामासाठी नागरिकातून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. एक ब्लँकेट एक टॉवेल व एक पाण्याची बंद बाटली अशा साहित्यासह मदत करावी. हे साहित्य ज्योतीनगर तसेच खानापूर तालुक्यातील खेडेगावांमध्ये वाटले जात आहे. फौंडेशनचे कार्यकर्ते 24 तास काम करत आहेत.
डॉ समीर सरनोबत, डॉ सोनाली सरनोबत, श्रीज्योत सरनोबत, स्नेहा, प्रियांका आजरेकर, कीर्ती सुरंजन, दीपा प्रभुदेसाई, ॲड भास्कर पाटील आदींनी हे काम सुरू केले आहे.
पुराने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. काहीजणांना स्थलांतरित होऊन राहावे लागत आहे. सरकारी शाळा मंदिरांमध्ये लोक राहत आहेत .अशांना ब्लॅंकेट मदत देऊन थंडीतून त्यांची सुरक्षा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या मोहिमेत सहभाग घेऊन एक ब्लँकेट आणि टॉवेल द्यावे असे आवाहन संघटनेने केले आहे इतके साहित्य देण्यासाठी एका किट साठी दोनशे रुपये खर्च येत असून ऑनलाइन स्वरूपात निधी द्यायचा असल्यास 9632613269 या पेटीएम क्रमांकावर किंवा [email protected] वर मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.