Monday, December 23, 2024

/

खड्डे काँक्रेटने बुजवत या संस्थने जपली सामाजिक बांधिलकी

 belgaum

गणेश उत्सवाच्या तोंडावर खड्डे बुजवण्याचे काम महापालिका यंत्रणेला करणे जरुरीचे आहे मात्र शासन करेल किंवा नाही याचा कोणताही विचार न करता जायंट्स या संस्थेने शहरातील मुख्य मार्गावरील खड्डे कॉंक्रेट घालून बुजवत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

राणी चनममा चौक ध. संभाजी चौक,संचयनी सर्कल खानापूर रो कॅम्प गोगटे सर्कल, मराठा मंदिर गोवा वेस सर्कल शेकडो लहान मोठे खड्डे बुझवले आहेत.

गेल्या पंधरवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील सर्वच रस्त्याची वाताहात झाल्याने असंख्य खड्डे पडले होते. या खड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत होते असे खड्डे बुजवण्याची गरज बनली होती.गेल्या तेहतीस वर्षांपासून समाजसेवेचे व्रत घेतलेल्या जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेच्या माध्यमातून या रस्त्याची डागडुजी करण्याचे ठरले पण हे खड्डे दगडमाती घालून बुजवण्यापेक्षा चांगल्या प्रतीच्या काँक्रीटने बुजवले तर अधिक चांगले होईल या विचाराने महाशक्ती या रेडीमिक्स काँक्रीट कंपनीला सोबत घेऊन कार्य करण्यात आले.

Pathholes

(फोटो:गोगटे सर्कल उड्डाण पुलाच्या पायथ्याशी काँक्रेट घालून रस्त्याच्या मधोमध बुझवलेली चर)

या अभिनव अशा प्रकल्पाची सुरवात मंगळवारी सकाळी महाशक्ती काँक्रेट सोल्युशनचे संचालक सूरज कदम यांच्या हस्ते राणी चनम्मा सर्कल येथे श्रीफळ वाढवून करण्यात आली.सकाळपासून जायंट्सचे सर्व पदाधिकारी, सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते तर प्रत्येक ठिकाणी जनतेतून समाधानी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या आणि जायंट्स मेनच्या या कार्याचे तोंडभरून कौतुकही करण्यात येत होते.

सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करून मोठे साठ ते सत्तर शेकडो लहान खड्डे बुझवले आहेत मंगळवारी रात्री के एल ई इस्पितळ छत्रपती शिवाजी उद्याना समोर खड्डे बुझवणार आहोत.रात्रीच्या वेळी रहदारी कमी असली काँक्रेट घट्ट बसेल त्यामुळे आज रात्री देखील हे काम हाती घेणार आहोत अशी सुनील भोसले यांनी दिली.

Pathholes

बेळगाव शहराला गेली तीन वर्षे कोट्यवधी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आला आहे अश्या रस्त्याना खड्डे पडू नयेत याची दक्षता मनपा अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे मात्र सुस्त प्रशासनाचे सामाजिक संस्थांनी खड्डे बुजवण्याच्या कार्याने तरी जागे होतील का पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.