बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणार्या जलाशयाचे वॉटर पंप नवीन बसवण्यात यावेत त्याठिकाणी नवीन वॉटर पंचची सोय व्हावी यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी जोरात प्रयत्न सुरू केले आहेत.
यासंदर्भात त्यांनी नगर विकास प्रशासन खात्याचे सचिव अंजुम परवेज यांची भेट घेतली. याचबरोबरीने डॉक्टर मोहिद्दिन बॉम्बेवाला यांची भेट घेतली आहे. त्यांनी या संदर्भात आपल्या सचिवांना सूचना दिली असून लवकरात लवकर बेळगाव शहरासाठी नवे वॉटर पंप उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वॉटर पंप बंद झाल्यामुळे शहरात पाण्याची समस्या गंभीर झाली असून यामुळे बेळगाव शहरवासीय हैराण झाले आहेत. पंपाची दुरुस्ती होईपर्यंत नवीन पंपाची व्यवस्था झाल्यास बेळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो .याची दखल आमदार अनिल बेनके यांनी घेतली आहे. लवकरच व्यवस्था होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हिंडलगा पंप वर दोन तर हिडकल जलाशयावर दोन मोठे असे एकूण चार पंपा वरून शहराला पाणी पुरवठा होत असतो सात आगष्ट रोजी मार्कंडेय नदीला आलेल्या पुरात हिंडलगा जल शुद्धीकरण केंद्रा वरील दोन्ही पंप मधून बिघाड झाला होता त्यातील एक पंपाची दुरुस्ती पूर्ण झाली असून दुसऱ्याचे दुरुस्ती काम सुरू आहे. अनेक अभियंते या दुरुस्ती कामात लागले आहेत तरी देखीप पंप दुरुस्ती व्हायला वेळ लागू शकतो .
दुसरीकडे हिडकल जलाशया वरील दोन्ही पंपाचे नुकसान झाले ते अध्याप बंद आहेत त्यांचीही दुरुस्ती सुरू आहे शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हायचे चार पैकी किमान दोन तरी पंप सुरू राहणे गरजेचे आहे अश्या परिस्थितीत वाटर पंप त्वरित आणि नवीन मिळाल्यास याचा फायदा संपूर्ण होणार आहे अन्यथा पाणी पुरवठा करण्यात अडचणी येणार हे निश्चित आहे.