Sunday, December 22, 2024

/

ए जी मूळवाडमठ बार असोसिएशन अध्यक्षपदी

 belgaum

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बेळगाव बार असोसिएशन(वकील संघटनेच्या)अध्यक्षपदी ए जी मुळवाडमठ विजयी झाले आहेत. त्यांनी जवळचे प्रतिस्पर्धी दिनेश पाटील यांचा 62 मतांच्या फरकांनी पराभव करत दुसऱ्यांदा बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद मिळवलं आहे.मुळवाडमठ यांनी राज्य बार कौन्सिल वर देखील यापूर्वी काम केले आहे.

बुधवारी सकाळी बेळगाव बार असोसिएशन साठी मतदान झालं त्यात एकूण 1865 पैकी 1532 वकिलांनी मतदान केले सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया रात्री अकरा पर्यंत चालली होती.सर्व सदस्य कार्यकारीणी मतमोजणी होताच अध्यक्ष पदाची देखील मोजणी झाली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मूळवाडमठ यांनी 62 मतांच्या फरकाने विजय मिळवला त्यांनी 583 मते मिळवली प्रतिस्पर्धी दिनेश पाटील यांना 521 मते,एम एन कुलकर्णी यांना 145 मते तर  मावळते अध्यक्ष एस एस किवडसन्नावर यांना 275 मते मिळाली.

MulwadmathI

इतर विजयी उमेदवार असे आहेत

महिला प्रतिनिधी म्हणून सरिता श्रेयनकर विजयी झाल्या त्यांना 614 मते मिळाली तर आरती नंदी 445 मते प्रीती देसाई 439 मते पडली. जनरल सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीत आर सी पाटील विजयी झाले आर सी पाटील 1010 मते मिळाली तर इतर गुरुसिद्धेश्वर हुलेर 138 मते जी सी कुसनुर 53 मते,सुलधाळ आर एल 308 मते मिळाली.
उपाध्यक्ष पदाच्या दोन जगासाठी सी टी मजगी गजानन पाटील विजयी झाले.सी टी मजगी 706 मत ,गजानन पाटील 524 मते पडली तर उर्वरित सुधीर चव्हाण 438 मते,विठ्ठल कामते 360 मते,सचिन शिवन्नवर 513 मते,श्रीमती जे एस मंडरोळी 176 मते मिळाली.जॉईंट सेक्रेटरी म्हणून शिवपुत्रप्पा फटकळ विजयी झाले.तर सहा कार्यकारिणी सदस्यांत पी के पवार,ओसी बसवराज,रमेश गौडाडगी,नितीन गंगाई,कलमेश मायानाचे यांनी विजय मिळवला.

विजयोत्सव

रात्री अकराच्या सुमारास पूर्ण निकाल लागले निकाल शेवटपर्यंत ऐकण्यासाठी वकिलांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केली होती विजयाची घोषणा होताच वकिलांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.